मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. मुंबईतील प्रश्नांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घनकचरा व्यवस्थापनसाठी 1200 कोटी रुपयांचं ग्लोबल टेंडर काडून 15 हजार स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करणाऱ्या महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या आहेत.