मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेडीयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडले. नीतीश कुमार हे एनडीएमध्ये सामील झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीतीश कुमार यांच्या आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीच नाहीतर जेडीयूचे नेतेही नाराज आहेत.
अशातच महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला रामराम केला असून आजच नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. नीतीश यांच्या निर्णयावर कपिल पाटील नाराज असून त्यांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच आजच नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची मिळत आहे. आमदार कपिल पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव होते.