नवी दिल्ली: महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे, तर सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारने नुकताच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्र राज्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले आहे. यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे तर छत्तीसगढने तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. वार्षिक सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराची पुन्हा एकदा निवड झाली आहे. इंदूरने सलग सातव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकवर असून महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
Maharashtra adjudged India’s cleanest state, followed by Madhya Pradesh, Chhattisgarh: Central govt’s annual cleanliness survey. pic.twitter.com/R1rhRrEO1r
— Press Trust of India (@PTI_News) January 11, 2024
Congratulations to Maharashtra’s Navi Mumbai for clinching the 3rd spot in the All India Clean City rankings.
Your commitment to excellence in swachhata sets a stellar example for others. Well done! #SwachhSurvekshanAwards @mieknathshinde @NMMConline pic.twitter.com/FMZz4RY9zj— Swachh Bharat Urban (@SwachhBharatGov) January 11, 2024