Cabinet Meeting Decision: राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात (Maharashtra Goverment Cabinet Decision) आली आहे. खरीप हंगामातील हा पहिला महत्त्वपूर्ण निर्णय ठरला असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आज ( 23 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. राज्यातील 30 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत वाटप केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे.
पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, तात्काळ पंचनामे पूर्ण करून मदत देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, धाराशीव, बीड, जालना आदी भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत.






