मुंबई: महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) मुंबईत दाखल झाले आहेत. सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) उपराष्ट्रपती झाल्यामुळे त्यांच्या जागी आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची (Governor) अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आज, सकाळी 11.00 वाजता राजभवनमधील दरबार हॉलमध्ये आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे प्रभारी राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत. यानंतर ते अधिकृतरित्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.

राज्याच्या या सर्वोच्च घटनात्मक पदावर आचार्य देवव्रत यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक बदल अपेक्षित आहेत. ते गुजरातमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखले जातात आणि आता महाराष्ट्रात त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचे अनुभव आणि कार्यशैली पाहता, त्यांच्या कार्यकाळात राज्याचा विकास आणखी वेगाने होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.







