मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सरकारने आठ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय
- वित्त विभाग: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
- सामाजिक न्याय विभाग: महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. सर्व सामान्यांना परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार
- सहकार व वस्त्रोद्योग विभाग: राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार
- ऊर्जा विभाग: कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता
- कामगार विभाग: इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार
- सामाजिक न्याय विभाग: बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण
हेही वाचा: