Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Budget: ‘अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार? दावोसचे करार अन् रोजगाराच्या लाखो संधी; विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 February 2026, 21:45
Maharashtra Budget: 'What will Maharashtra get from the budget? Davos agreements and millions of employment opportunities; Chief Minister's direct challenge to the opposition

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget) पार्श्वभूमीवर महायुती सरकारने पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे. विरोधकांनी (Devendra Fadanavis) केवळ आरोप करून मोकळं होऊ नये, तर अधिवेशनात ठोस प्रश्न मांडावेत आणि सरकार (Sunetra Pawar) सविस्तर उत्तर देईल, असं स्पष्ट (Ajit Pawar) विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “हवेत गोळीबार करून पळून जाणं योग्य नाही. शंका असतील तर त्या सभागृहात मांडा. आम्ही चर्चेला तयार आहोत,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. फडणवीस म्हणाले की, अजितदादांनी अर्थसंकल्पाची चांगली तयारी केली होती. “अर्थखात्याची शिस्त त्यांनी कधीही मोडू दिली नाही. आर्थिक बाबतीत ते स्पष्ट आणि ठाम भूमिका घ्यायचे,” असे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थकारणाबाबत बोलताना फडणवीस यांनी केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत 20 हजार कोटींची वाढ झाल्याचं सांगितलं. तसेच 98,300 कोटी रुपयांचा कर परतावा मिळणार असल्याची माहिती दिली. दावोस परिषदेत 30 लाख कोटी रुपयांचे करार झाल्याचा उल्लेख करत त्याविषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पात मांडली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘महाविस्तार’ नावाचं एआय अॅप तयार करण्यात आल्याचं सांगत, शेतकऱ्यांना पिकांचा फोटो काढून त्वरित माहिती मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.

 

सुनेत्रा पवार यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत बोलताना अजित पवारांच्या विकासदृष्टीचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. “महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प होता. तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं त्या म्हणाल्या. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तरतूद कायम ठेवण्यात आल्याचा उल्लेख करत, ही योजना सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आर्थिक शिस्तीचं कौतुक केलं. “नियतीसमोर आपण हतबल आहोत, पण त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे,” असं ते म्हणाले. दावोस करारांमधून 40 ते 50 लाख रोजगारनिर्मितीचा दावा करत, निवडणुकीत दिलेल्या घोषणा योग्य वेळी पूर्ण केल्या जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं.

विरोधकांनी पाठवलेल्या 18 मुद्द्यांच्या पत्रावर टीका करत फडणवीस म्हणाले की, मातृभाषा दिनी एवढ्या भाषिक चुका असलेलं पत्र पाठवणं दुर्दैवी आहे. मात्र तरीही सरकार चर्चेला तयार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हं आहेत. मात्र सरकारने संवादासाठी दारं उघडी ठेवली असल्याचा संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील 34 प्रकरणांमध्ये सरकारी जमिनींचा गैरवापर; तब्बल 194 कोटींच्या जमिनी सरकारजमा

Wednesday, 17 June 2026, 13:07

लोणावळ्यातील बंगल्यावर पोलिसांची अचानक धाड; मालकासह 18 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Wednesday, 17 June 2026, 13:03

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा कापलेला पाय मावशीच्या दाराला टांगला; घटनेने परिसरात खळबळ

Wednesday, 17 June 2026, 12:05

पीएमपीचे बसथांबे आता होणार हायटेक; 200 अत्याधुनिक शेल्टरसह प्रवाशांना मिळणार ‘बेस्ट’ सुविधा

Wednesday, 17 June 2026, 11:40

‘तू आमच्या घरातील महिलेच्या मागे का लागतोस?’ म्हणत तरुणाचा काटा काढला; सोलापूर येथील घटना

Wednesday, 17 June 2026, 11:15

Pune: कौटुंबिक छळाने हताश पित्याचा अंत; पत्नी आणि मुलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Wednesday, 17 June 2026, 10:54
Next Post
Pune Bribe News: ACB action in Paud police station! Sub-inspector arrested red-handed while taking bribe of Rs 35 thousand

Pune Bribe News: पौड पोलीस ठाण्यात एसीबीची कारवाई ! 35 हजारांची लाच घेताना उपनिरीक्षकाला रंगेहात अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.