नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून २० नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे, तर निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत या तारखा जाहीर केल्या आहेत. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान पार पडणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे, त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.
288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
नव मतदार – 20.93 लाख
पुरूष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
युवा मतदार – 1.85 कोटी
तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार – 6.32 लाख
महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
शहरी मतदार केंद्र – 42,604
ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960