मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासोबत झालेल्या अपघाताबाबत विचारपूस केली. राज्य शासन व जनतेच्यावतीने लवकर बरे होण्यासाठी शिंदे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
अभिनेता गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल, याची खात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्याआणि त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी अभिनयाद्वारे लाखो लोकांना आनंद दिला आहे. त्यांच्या प्रकृतीस्वास्थासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.