मुंबई : आजकाल चायनीझ खाद्य पदार्थ्यांची चांगलीच रेलचेल पहायला मिळत आहे. चायनीझ फूड लव्हर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लग्न, साखरपुडा किंवा अजून कुठल्या समारंभात बुफेंमध्येही आता चायनीझ पदार्थांनी हजेरी लावल्याचे पहायला मिळात आहे. अशाच एका बुफेमध्ये बनविल्या जाणाऱ्या नूडल्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झालेला आहे. त्यावर अनकाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नूडल्स बनविणारा माणूस, त्याची पद्धत आणि एकंदरीत तेथील अस्वच्छता पाहून नेटकरी खूपच हैराण आणि नाराज झाल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून समजते.
या व्हिडीओमध्ये लग्नात जसे जेवणाचे काउंटर असते, तसे काउंटर पाहायला मिळत आहेत. त्यात एक निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आणि मानेपर्यंत लांब केस असणारा एक मध्यम वयाचा माणूस दिसत आहे. तो त्याच्यासमोर असणाऱ्या एका काळ्याकुट्ट कढईमध्ये नूडल्स बनवितान दिसत आहे. मात्र, तो एका हातामध्ये मोठा चमचा घेऊन, तोच हात कोपरापर्यंत कढईमध्ये घालून नूडल्स ढवळत आहे. इतकेच नाही, तर त्या ढवळलेल्या नूडल्स पुन्हा एकदा दुसऱ्या हाताने मोकळा करत आहे. त्या माणसाचे दोन्ही हात कोपरांपर्यंत नूडल्स आणि तेलाने बरबटल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या किळसवाण्या प्रकाराला, जमिनीवरील पसाऱ्याची आणि अस्वच्छपणाची जोड आहेच. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर mh_official_33 नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नूडल्स बनविण्याची अशी पद्धत पाहून नेटकरी नेमके काय म्हणाले आहेत ते पाहू.
एकाने, “आजपासून लग्नातले जेवण अजिबात जेवणार नाही,”असे म्हटले आहे. “नूडल्समध्ये आंघोळ करून झाली. आता त्यानं तोंडपण धुऊन घ्यायचं ना,” असे दुसऱ्याने म्हटले आहे. तिसऱ्याने, “बापरे! पिवळ्या रंगाचे नूडल्स?” असे व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नूडल्सच्या रंगावरून लिहिले आहे. “दादा, जरा ते हाताला लागलेले नूडल्पपण ताटात वाढा ना…” असे चौथ्याने मार्मिकपणे लिहिले आहे.