मुंबई : मुंबईतील ठाणे शहारतसर्वात मोठे आणि पहिले सेंट्रल पार्क सुरु करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण झाले. यावेळी एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, मुंबई आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे.
हे उद्यान आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ‘द ग्रॅंड सेंट्रल पार्क’ आता ‘नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क‘ या नावाने ओळखले जाईल, असंही त्यांनी यावेळी जाहीर केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोलशेत भागात 20.5 एकर जागेवर साकारलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला.
राज्यातील हे सर्वात मोठे उद्यान आहे. त्याच्या उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. 20.5 एकर जागेवर साकारलेल्या उद्यानात सुमारे 3 हजार 500 झाडे आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच, त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. कल्पतरू डेव्हल्पर्सने टीडीआरच्या माध्यमातून हे उभे केले आहे. महानगरपालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे उद्यान उभे राहिले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
#ठाणे महानगरपालिका आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ‘ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’चे लोकार्पण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते झाले. लोकार्पण सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री @dvkesarkar, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते. pic.twitter.com/ew3jTBEfl3
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 8, 2024