मुंबई : राज्य सरकारकडून वंशावळानुसार कुणबी प्रमाण पत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबतच्या शासन निर्णयाचे पत्रक मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे. वंशावळ प्रमाण पत्रांचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मागणीसाठी समर्थकांसह मुंबईची वाट चालत आहेत. काल त्यांनी मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांनी काल नगर जवळील भींगार गावात सभा घेतली होती. तसेच २६ तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर ते आमरण उपोषण देखील सुरू करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठे पाऊल उचलले आहे. गे उपोषण किती दिवस चालेल हे सांगत येत नाही.त्यासाठी सर्व समर्थक गरजेच्या वस्तू घेऊन मुंबऊकडे रवाना झाले आहेत.
तहसीलदार यांना वंशावळानुसार प्रमाण पत्र वाटपाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवल्याची माहिती मिळत आहे.