Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजितदादांनी शेतकऱ्यांना दिली गुडन्यूज; कृषिपंपांचे थकीत वीजबिल माफ होणार, जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्वाच्या घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 June 2024, 17:39
Know the scheme for farmers in maharashtra budget 2024-2023

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज (दि. २८) अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी राज्यातील कृषी क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच काही नव्या योजनांचीही सुरुवात देखील केली जाणार आहे. अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करणार असल्याची मोठी घोषणा केली. या घोषणेसह अन्य महत्वाच्या योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या जाणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा:

  • नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, २०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रुपयांची मदत
  • नोव्हेंबर डिसेंबर, २०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २४ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटी रुपयांची मदत
  • नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत
  • खरीप हंगाम, २०२३ करीता ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ तर १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू
  • नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू
  • ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपये अनुदान
  • ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून ५ हजार १९० कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा ६ हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबविण्यात येणार
  • मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत १ हजार ५६१ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजूरी सुमारे ९ लाख शेतकऱ्यांना लाभ
  • राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात २ लाख १४ हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी १ हजार २३९ कोटी रुपये अनुदान
  • ”गाव तेथे गोदाम” या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती
  • कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलधियांच्या उत्पादकतेत पाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन २०२४-२५ मध्ये ३४१ कोटी रुपये निधी
  • आधारभूत किंमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलथियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी
  • खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकयांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२३-२४ मध्ये ३५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे ८५१ कोटी ६६ लाख रुपये अनुदान
  • कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी
  • नोंदणीकृत २ लाख ९३ हजार दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे २२३ कोटी ८३ लाख रुपये अनुदान वितरीत, राहिलेले अनुदानही त्वरित वितरीत करणार
  • दूध उत्पादक शेतकयांना आधार देण्याकरिता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै, २०२४ पासून पुढे चालू ठेवण्यात येणार
  • पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नय उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’
  • शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प
  • मत्स्यबाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांसाठी आवश्यक निधी
  • अटल बांबू समृद्धी योजनेतून १० हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड, प्रतिरोपासाठी १७५ रुपये अनुदान
  • राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड नंदुरबार जिल्ह्यात १ लाख २० हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड
  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी नुकसान भरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये, कायमचे अपंगत्य आल्यास ५ लाख रुपयांवरून ७ लाख ५० हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजारावरून ५ लाख रुपये, किरकोळ जखमी इङ्गल्यास २० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये अशी वाढ, शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये वाढ
  • सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम दोन वर्षात ६१ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित- सुमारे ३ लाख ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता
  • महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम १५५ प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे ४ लाख २८ हजार हेक्टर पादीय क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ
  • विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणांचाती नाबार्डकडून १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य
  • म्हैसाळ, जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प अंदाजित किंमत एक हजार ५९४ कोटी रुपये सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ
  • स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण ४ हजार २०० कोटी रुपये खर्च
  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला थ बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ
  • कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार २०० कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम
  • जलयुक्त शिवार अभियान२ अंतर्गत ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
  • ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ६ हजार शेतकऱ्यांना लाभ जलयुक्त शिवार योजनेतून ४५ कोटी रुपयांचा निधी
  • मागेल त्याला सौरऊर्जा पंप शेतकयांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प एकूण ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार.
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53

नागपूर हादरलं! ऑनलाईन गेमचा नाद बेतला तरुणाच्या जीवावर

Wednesday, 21 May 2025, 22:41

रायगडात भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, 2 चालकांसह वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी

Wednesday, 21 May 2025, 21:40

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

Wednesday, 21 May 2025, 21:19

पुण्यात विकृतीचा कळस ; टीव्ही पाहायला येणाऱ्या तरुणीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Wednesday, 21 May 2025, 20:16

थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात अनोळखी माळकऱ्याचा मृत्यू ; पिशवीत सापडली सुमारे 2 लाख 40 हजारांची रोकड

Wednesday, 21 May 2025, 19:59
Next Post
DCM ajit Pawar presents Maharashtra Budget for 2024-25

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह थकीत कृषी वीज बिल माफीचा मोठा निर्णय

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.