Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! टिटवाळा परिसरात मृत्यूचे तांडव; कल्याण-मुरबाड रस्त्यावर सिमेंट मिक्सर आणि इकोची धडक, 11 ठार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 April 2026, 16:49

Kalyan Accident : टिटवाळा: कल्याण मुरबाड मार्गावरील रायते पुलावर आज सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण दुर्घटनेत 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने मुरबाड परिसरातील रहिवाशांचा समावेश असून, हे सर्वजण कामानिमित्त कल्याणला आले होते आणि तिथून पुन्हा घराकडे परतत होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रायते पुलावर सध्या एका बाजूनेच वाहतूक सुरू आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. सकाळी 10.45 च्या सुमारास कल्याणहून मुरबाडकडे जाणारी इको टॅक्सी आणि समोरून येणारा सिमेंट मिक्सर यांची धडक इतकी भीषण होती की टॅक्सीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसलेले होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे. पुलाचे काम पूर्ण झालेले नसताना आणि सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरू केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बबलू चंदने, जिजा केंबरी, गणपत चंदे, अनंत पवार आणि भूषण घोरपडे यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या चुकीमुळे, याचा सविस्तर तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यावर शोककळा पसरली असून सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08

पुणे प्राईम न्यूजच्या माजी उपसंपादीका ज्योती कदम यांचे अकाली निधन; पुणे पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

Wednesday, 15 April 2026, 19:29

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23
Next Post

सावधान! तुम्हालाही प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतोय? असू शकतं 'या' मानसिक तणावाचं लक्षण; जाणून घ्या कसं राहायचं शांत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.