पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता BMC अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सल्लागार, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पद भरली जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 16 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. उमेदवाराला दरमहा 32 ते 75 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून, 35 वर्षे अशी ही वयोमर्यादा असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– एकूण रिक्त पदे : 16 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 32,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 18-35 वर्षे. (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : सह कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यू.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग पहिला मजला रुम नं. 13 डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.