पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला मुंबई येथे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेबाबत माहिती देणार आहोत. ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’, मुंबई येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, रिक्त पदावर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करता येणार आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’, मुंबई येथे संशोधन सहाय्यक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार असून, ही मुलाखत 28 ऑगस्ट 2024 ला घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,12,500 पर्यंत पगार मिळू शकणार आहे.
उमेदवारांना मुलाखतीसाठी आयसीटी, माटुंगा, मुंबईचा पॉलिमर आणि सरफेस कोटिंग कॉन्फरन्स रूम विभाग येथे जावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.