मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक घेतला. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली आहे. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीनी शरद पवार यांच्याबद्दल एक अभिमानास्पद वाक्य वापरल्याचं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायदान करण्याच्या आसनावर बसलेले असताना आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल जी टीप्पणी केली आहे, ती छाती फुगवणारी होती. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाने न्यायासनावर बसून अशी टीप्पणी कोणाबद्दल केली असेल, असे मला तरी आठवत नाही. सर्वोच्च न्यायालयाला जे कळले ते ज्या बालकांना हाताला धरून शरद पवार साहेबांनी चालविले; त्यांना समजले नाही, हे दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टीप्पणीने माझा मात्र उर भरून आला, असं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्यायदान करण्याच्या आसनावर बसलेले असताना आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल जी टीप्पणी केली आहे ती छाती फुगवणारी होती. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते आहेत. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशाने न्यायासनवर…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 14, 2024