मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनाही डेंग्यू झाला आहे. जयंत पाटील यांनी ‘ट्विट’ करत ही माहिती दिली आहे. काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच पक्षाच्या दैनंदिन कामाला सुरूवात करेन, असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयाचा तपासणी अहवाल जयंत पाटलांनी ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात लिहिलं की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरूवात करेन.”
कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन. pic.twitter.com/AkkQGS5zhM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 14, 2023