मुंबई : राज्यात निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून दिवाळीनंतर आता प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला.
कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शिंदे यांच्या पहिल्याच सभेची सुरुवात आयटम सॉंगने करण्यात आल्याने सध्या याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची यंदाच्या विधानसभेसाठी ही पहिलीच जाहीर सभा होती.
या आयटम साँगचा व्हिडिओ ठाकरे गटाने सोशल मीडियावर शेअर करत टीका केली आहे. शिंदे गटाच्या कुर्ला विधानसभा उमेदवारचा तथाकथित जनहित प्रचार! महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारे!!! असे म्हणत ठाकरे गटाने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मुख्यमंत्री संपूर्ण राज्यभर सभा घेणार आहेत. यामध्ये ते फक्त शिवसेनेच्याच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
शिंदे गटाचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्री यांची पहिली जाहीर सभा आज कुर्ला येथे होत आहे
त्याआधी लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून कुडाळकरांनी कार्यक्रम ठेवलाय
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लोप होत गायपट्टा संस्कृती राज्यात यायला सुरुवात#MaharashtraElection2024 pic.twitter.com/wvPQZhJ5VU
— Girish Kamble (@GirishKamble22) November 3, 2024