मुंबई : नवी मुंबईत आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी मनसैनिकांना मारहाण केली आहे. मनसे नेते मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
नवी मुंबईत आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला. माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी मनसैनिकांना मारहाण केली आहे. मनसे नेते मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश जाधव यांच्यावर सध्या खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा देखील माथाडी कामगारांनी फोडल्या आहेत. तर काही मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेरूनच पळ काढला आहे.
अमित ठाकरे यांच्यावर आरोप
माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी आमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी बोलवून आपल्याला अमित ठाकरे यांनी शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे.