Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत मृत्यूनंतरही 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह! अमेरिकेतल्या टेक्नोलॉजीनं ‘भविष्यात पुन्हा जिवंत होईल’ या आशेने कुटुंबाचा धक्कादायक निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 September 2026, 12:02

मुंबई : भविष्यात विज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने एका कुटुंबाने 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह तब्बल 4 वर्षे फ्रीजरमध्ये जतन करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाडच्या कुरार गाव परिसरात समोर आला आहे. कोकणीपाडा भागातील एका डे-केअर सेंटरमध्ये हा मृतदेह ठेवण्यात आला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वृद्धाचा 9 जून 2022 रोजी कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलीचे अमेरिकेत वास्तव्य असून वडिलांशी तिचे भावनिक नाते होते. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या क्रायोनिक्स तंत्रज्ञानाबाबत कुटुंबाला माहिती होती. मृतदेह अतिशय कमी तापमानात सुरक्षित ठेवला, तर भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीनंतर त्याला पुन्हा जिवंत करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असा कुटुंबाचा विश्वास असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याच विचारातून मृतदेह जतन करण्यासाठी डे-केअर सेंटरला दरमहा सुमारे 1.60 लाख दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा मृतदेह नेमका कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या परिस्थितीत इतका काळ ठेवण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित सेंटरला बीएमसीने सुमारे 3 महिन्यांपूर्वी सील केले होते. मात्र, त्यावेळी तेथे फ्रीजरमध्ये मृतदेह असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कसे आले नाही, असा सवाल माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

 

कुटुंबीयांनी मृत्यू प्रमाणपत्रासह संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे दिली आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे. मृतदेहाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कूपर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. मृतदेह अशा पद्धतीने जतन करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य होते का, याचाही कुरार पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ट्विस्ट! राष्ट्रवादीत फूट , पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला लागणार?

Wednesday, 30 September 2026, 12:35

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं …

Wednesday, 30 September 2026, 12:18

मुंबईत मृत्यूनंतरही 4 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवला 78 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह! अमेरिकेतल्या टेक्नोलॉजीनं ‘भविष्यात पुन्हा जिवंत होईल’ या आशेने कुटुंबाचा धक्कादायक निर्णय

Wednesday, 30 September 2026, 12:02

दुष्काळाच्या सावटात महाराष्ट्राच्या तिजोरीची कसोटी ; महसुली तूट, वाढते कर्ज आणि कल्याणकारी खर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर दुहेरी आव्हान

Wednesday, 30 September 2026, 11:55

आधी धमक्या, मग खंडणीची मागणी! बिल्डरकडून 1.35 लाख घेतल्याचा आरोप; रबाळे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Wednesday, 30 September 2026, 11:39

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14
Next Post

पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य; चुलत भावानचं ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp