मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतरचे एक्झिट पोलचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. मॅट्रीसच्या मते, पुन्हा एकदा महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येताना दिसत आहे. महाविकास आघाडीसाठी हे निकाल निराशाजनक असणार आहेत. मॅट्रिक्सच्या निकालानुसार महायुतीला 150 ते 170 तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळताना दिसत आहेत.
मॅट्रीसने जाहीर केलेल्या ताज्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला स्पष्ट विजय मिळताना दिसत आहे. त्यानुसार 288 सदस्यीय विधानसभेत महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडी 110 ते 130 जागांवर विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ५८.२२ टक्के मतदान झालं आहे. ज्यामध्ये नागरिक लोकशाही प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी झालेलं दिसून आले.
एक्झिट पोलने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे सुद्धा निकाल जाहीर केले होते. त्यावेळी एक-दोन सर्व्हे एजन्सी वगळता कोणाचाही अंदाज बरोबर आलेला नव्हता. त्यावेळी शिवसेनेकडे प्रचंड बहुमत असल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष निकालानंतर अंदाज तो चुकीचा ठरला होता. मात्र, 2019 मध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याची चर्चा होती ती मात्र खरी ठरली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस पक्षाने भाग न घेण्याची भूमिका घेतलीय आहे. . हे पाऊल अशा वेळी आले आहे. जेव्हा राजकीय विश्लेषक आणि पक्ष एक्झिट पोलच्या अंदाजांची वाट पाहत आहेत. काँग्रेसने त्यांच्या अनुपस्थितीचे कारण अदयाप तपशीलवार स्पष्ट केलेले नाही.
विविध संस्थांचे एक्झिट पोल काय म्हणतात?
पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात टफ फाईट असणार आहे. या अंदाजानुसार, महायुतीला निवडणुकीत 137-157 जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला 126-146 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ते 8 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.
पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असून राज्यात महायुतीला 152 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 10 जागांवर यश मिळू शकतं.
चाणक्यच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार महायुतीला 152 ते 160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.