मुंबई : यशश्री शिंदे हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणातील एक मोठी माहिती समोर आली आहे. 2019 साली यशश्रीच्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेख वर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी दाऊद शेख कोर्टात सुनावणीसाठी नेहमीच गैरहजर राहत असल्याने पनवेल न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट काढत अटक करण्याचे आदेश दिले होते.
20 जुलै रोजीच अजामीन पात्र वॉरंट काढून पोस्को गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांकडून दाऊदला अटक करण्यात दिरंगाई करण्यात आली आणि यात यशश्रीचा हकनाक बळी गेला. जर पनवेल न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन नवी मुंबई पोलीसांनी ताबडतोब केले असते असते तर 25 जुलैची घटना टळली असती. 22 तारखेपासून आरोपी दाऊद शेख नवी मुंबई क्षेत्रात दाखल होता. त्यानंतर 25 जुलैची रोजी यशश्रीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.