Maharashtra Politics : राज्यातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, भाजप लोकसभा निवडणुकीच्या 26 जागा लढवणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी 22 जागा लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Devendra Fadnavis)
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असून प्रस्तावित जागांवर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या मतदारसंघाचे सर्व्हेक्षण झाले असून मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला मतदारांची पंसती आहे, याचे कल आमच्या हाती आले आहेत.
आमच्याकडे विजयी होणाऱ्या उमेदवारांची माहिती आली आहे. 2019 मध्ये निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणं ही आपली परंपरा आहे. पण, हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Maharshtra Political Updates)
भाजप 26 जागांवर तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे 22 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 मध्ये, भाजपने लोकसभेच्या 25 जागा लढवल्या होत्या आणि तत्कालीन शिवसेनेने 23 जागा लढवल्या, त्यापैकी भाजपने 23 आणि सेनेने 18 जागा जिंकल्या होत्या.
2019 च्या निवडणुकीपेक्षा आगामी निवडणुकीत भाजपच्या कामगिरीमध्ये बदल झालेला असेल, असेच आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती 40 ते 42 जागांवर निश्चित आहे. असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.(Loksabha Election 2024)