मुंबई : मिरा भाईंदरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव क्रेनने महिलेला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की महिलेच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेला क्रेनने महिलेला चिरडल्याची घटना घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केअर हॉस्पिटल सिग्नलजवळ ही घटना घडली असून एका वयोवृद्ध महिलेला क्रेनने चिरडले आहे. यामध्ये महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेन चालकाला ताब्यात घेतले.
या अपघातामध्ये घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सिग्नलवर वाहतूक पोलिस देखील उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा तपास नवघर पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मृत्यू झालेली महिला कोण होती? याची ओळख पटवली जात आहे.