मुंबई : मुंबईत मागील अनेक दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना वाढतच असलेल्या दिसत आहेत. नुकतंच मुबंईतील वांद्रे येथे २५ वर्षीय एका मॉडेलचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत खळखळ उडाली आहे. अपघातात मृत पावलेल्या या
याबाबत अधिक माहिती अशी की, मॉडेलचं नाव शिवानी सिंह असून गुरूवारी शिवानी तिच्या मित्रासोबत मोटारसायकलने प्रवास करत होती. दरम्यान वांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे पोहचताच त्यांच्या दुचाकीला टँकरने जोरदार धडक दिली. टँकरच्या जबर धडकेत या मॉडेलचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा मित्र हा थोडक्यात बचावला आहे. गुरूवारी ही धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी सिंह ही तिच्या मित्रासोबत रात्री ८ च्या सुमारास मोटारसायकलने जात होती. यावेळी वांद्रे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जात असताना त्यांना टँकरनी जोरदार धडक दिली. या पडतात दोघेही खाली पडले. दरम्यान मोटारसायकल चालवणारा तिचा मित्र हा बाजूला पडला. तर शिवानी टँकरच्या चाकाखाली आली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. दरम्यान ताबडतोब शिवानीला रूग्णालयात नेण्यात आले असता तिचा मृत्यू झाला.
शिवानीच्या मित्राने हेल्मेट घातला होता यामुळे तो थोडक्यात बचावला. या अपघातात शिवानीच्या मित्राचा पाय मोडला आहे. संपूर्ण घटनेची पोलिस चौकशी करत असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले आहेत. टँकर चालक घटना परिसरातून फरार झाला असून पोलिस त्याला लवकरच अटक करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.