Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांगलीच्या हृदयाची मुंबईकराच्या छातीत धडधड; अवघ्या ३४ मिनिटांत सांगलीतून कोल्हापुरात अन् २ तासांत मुंबईत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 28 November 2023, 17:45

सांगली : आधुनिक वैद्यकशास्त्राच्या जादूची अनुभूती नुकतीच मुंबईतील एका रूग्णाला आली. मुंबईतील रूग्णालयात गेल्या एक वर्षापासून कृत्रिम श्वासावर मरणासन्न अवस्थेत असलेल्या या रूग्णाच्या शरीरात सांगलीतील रूग्णाच्या हृदयाची धडधड अवघ्या तीन तासांत सुरू करणे शक्य झाले. उष:काल अभिनव इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सच्या तज्ज्ञांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

सांगलीतील उष:काल रुग्णालयात उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी (वय ४५) यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ब्रेन डेड झाल्याने रुग्णालयाने कुटुंबीयांना विश्वासात घेत अवयवदानाचा प्रस्ताव मांडला. या रूग्णाचे अवयवदान केल्यास काही रूग्णांना पुन्हा आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे सांगत रूग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांना राजी केले.

कुटुंबीयांनीही हा निर्णय मान्य केल्यानंतर याबाबतची तयारी करण्यात आली. सांगली ते कोल्हापूर आणि सांगली ते पुणे या दोन मार्गांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सांगलीहून खास रूग्णवाहिकेतून कोल्हापूरला ३४ मिनीटांत हे हृदय पाठवण्यात आले. तत्काळ त्याचे रूग्णावर प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रियाही हाती घेण्यात आली.

 

दुसरीकडे मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण वर्षभरापासून कृत्रिम श्वासावर असून, त्यांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याची माहिती रुग्णालयाकडे होती. त्यानुसार तिथे संपर्क साधत पुढील प्रक्रिया केली. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पोलिस प्रशासनाला आदेश दिल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ ची तयारी करण्यात आली.

हृदय ठराविक वेळेत मुंबईत पोहोचणे आवश्यक असल्याने कोल्हापूरच्या विमानतळावरून खासगी विमानाने ते पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सांगली वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी टीम तयार करत रविवारी दुपारी पावणेदोन वाजता हृदय कोल्हापूरकडे नेण्यात आले.

सत्तर पोलिसांचा ताफा, सुरूवातीला पोलिसांची गाडी, त्यानंतर रुग्णवाहिका, हृदय घेऊन असलेली रुग्णवाहिका आणि नंतर पोलिसांची गाडी. अवघ्या ३४ मिनिटांत कोल्हापुरात जात हृदय मुंबईला रवाना झाले. मेंदूचे काम थांबल्यान येथील सांगली मधील रामानंद सत्यनारायण मोदानी याच्या कुटूंबाने अवयवदानाचा निर्णय घेतला. ‘ग्रीन कॉरिडॉर’ने हृदय कोल्हापुरातून खास विमानाने मुंबईला तर इतर अवयव रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठविण्यात आले.

सायंकाळी पाचच्या सुमारास हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रियाही मुंबईत सुरू करण्यात आली. दुसरीकडे अन्य अवयव पुण्यासाठी रवाना झाले. मिरज येथील वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांनी त्यासाठी नियोजन केले. अवघ्या अडीच तासांत अवयव घेऊन हा ताफा पुण्यात दाखल झाला. पुण्यात उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांना याचे प्रत्यारोपण केले जाणार आहे. तर सांगलीतील दोन रुग्णांसाठी नेत्र उपयोगात येणार आहेत.

एकाच व्यक्तीचे पाच अवयव दान करण्यात आले. यामुळे अवयव दान चळवळीमधील ही एक महत्त्वाची घटना असल्याचे अवयव दान केलेल्या कुटूंबातील व्यक्तीची देखील भावना आहे. आज आमच्या कुटुंबातील सदस्य शरीररूपाने जरी जिवंत नसला तरी त्याच्या अवयव रूपातुन त्याची धडधड आणखी काही काळ सुरू राहील याची अभिमान असल्याचे कुटुंबाने भावना व्यक्त केल्या.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Marital status doesn’t eclipse right to privacy: Karnataka HC

लग्नानंतर पत्नीही नवऱ्याच्या 'आधार'ची माहिती मागू शकत नाही, हायकोर्ट म्हणाले, गोपनीयता लग्नाने संपत नाही...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.