health news : मुंबई : व्यायाम हा शरीरासाठी गरजेचा मानला जातो. व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त ठेवता येऊ शकते. त्यात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. त्यामुळे व्यायाम करण्याला प्राधान्य द्यावे असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी जड व्यायाम करणे टाळावे. व्यायाम करताना स्पर्धा करणेही टाळण्याचा सल्ला दिला जातो.
व्यायाम करताना स्पर्धा करू नका. आजकाल आपल्या मुलाला जिममध्ये बॉडी बनवताना पाहून वृद्ध वडीलही बॉडी बिल्डिंगच्या फंदात पडतात आणि अनेक वेळा असे प्रयत्न जीवघेणे ठरतात. वृद्धांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. पण स्पर्धा करू नये. जिममध्ये प्रशिक्षकांचे प्रशिक्षण खूप महत्त्वाचे आहे. जिम प्रशिक्षकांना 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा वैद्यकीय इतिहास माहीत असणे आवश्यक आहे.
जर कुटुंबातील कोणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असेल किंवा मधुमेह, रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यांनी हलका व्यायाम करावा. व्यायामशाळेत स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर असणे आवश्यक आहे. जेणेकरून हृदयविकाराच्या स्थितीत त्वरित शॉक दिला जाऊ शकतो. हृदयविकाराचा झटका कधी कधी शरीराला सिग्नल देत असतो. छातीत दुखणे, डाव्या हातामध्ये तीक्ष्ण वेदना यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. ईसीजी, साखर, बीपी तपासण्यासाठी फारसा खर्च येत नाही. म्हणून या गोष्टी प्राधान्याने केल्या पाहिजेत.