Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिरोसारखा दिसतो, बीएमडब्ल्यू चालवतो; रीलस्टारवर जडलं तरुणीचं प्रेम, त्याने लग्नाचं आमिष दाखवलं अन् नंतर जे घडलं ते…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 15 November 2025, 21:37
He looks like a hero, drives a BMW; A young woman fell in love with the reel star, he promised her marriage and what happened next...

Photo-Social Media

मुंबई: डोंबिवली पश्चिममध्ये भावी वधूची (Mumbai Crime) तब्बल 92 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर ओळख करून प्रेमसंबंध ठेवत आरोपीने पीडितेला लग्नाचं आश्वासन दिले होते. त्यानंतर आपल्या घरावर ईडीची धाड पडल्याचं सांगत सोन्याचे दागिने आणि मोठी रक्कम उकळल्याचं विष्णुनगर पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास करत शैलेश प्रकाश रामगुडे या 30 वर्षीय रीलस्टारला अटक केली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्स असल्याची माहिती समोर आली असून त्याने आतापर्यंत अनेक तरुणींची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फसवणुकीतून मिळालेले सोनं त्याने ठाण्यातील सोनारांना विकले होते, ते पोलिसांनी जप्त केले आहे. (Latest Breaking News)

पोलिसांच्या माहितीनुसार पीडित तरुणी ही डोंबिवली पश्चिमेतील हायप्रोफाईल सोसायटीत राहते, तर आरोपी शैलेश हा ठाणे पश्चिमेतील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतो. 2024 मध्ये दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सप्टेंबर 2024 मध्ये आरोपीने आपल्या घरावर ईडीची धाड पडल्याचे सांगत दोन किलो सोनं आणि एक कोटी रुपये जप्त झाल्याचा दावा केला. ते सोडवण्यासाठी त्याने पीडितेकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 92 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज घेतला.

सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या काळात हा प्रकार सुरू राहिला. त्यानंतर आरोपी लग्नाच्या चर्चेतून मागे हटला आणि पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे पीडितेने 5 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तांत्रिक तपासात आरोपी तरुणींना बीएमडब्ल्यू कार आणि ऐशोआरामी जीवन दाखवत आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे उघड झाले. मॉडेलिंग क्षेत्रात काम करतो असा खोटा आव आणून तो तरुणींवर विश्वास बसवत असे आणि संधी साधून त्यांच्याकडून पैसे व दागिने घ्यायचा. उद्देश साध्य झाल्यावर तो संपर्क तोडत असे.

पोलिसांनी शैलेशकडून 39 तोळे सोनं, एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने यापूर्वीही एका पीडितेकडून 43 लाख आणि दुसऱ्या प्रकरणात 29 लाखांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. हे सर्व प्रकार लक्षात घेता विष्णुनगर पोलीस ठाण्याने तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

Sunday, 30 August 2026, 16:33

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात ‘डीलिंग’ झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले….

Sunday, 30 August 2026, 16:33

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56
Next Post
Nitin Gilbile Murder: Nitin Gilbile's killers arrested; 4 accused arrested based on CCTV

Nitin Gilbile Murder: नितीन गिलबिलेच्या मारेकऱ्यांना अटक; सीसीटीव्हीच्या आधारे 4 आरोपींना बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp