भाईंदर : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता भाईंदरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती खिडकीतून लपून लहान मुलींना आंघोळ करताना बघत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं.
या घटनेनंतर मुलीने तिच्या आईला हे सगळं प्रकरणं सांगितले. यानंतर आईने त्या व्यक्तीस पकडण्यासाठी तिच्या घराबाहेर कॅमेरा लावला. त्यात तो दोन दिवस खिडकीतून पाहताना दिसला. यावेळी संपूर्ण प्रकरण संबंधित मुलीच्या आईने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्या व्यक्तीला मनसे स्टाईलने चोप देण्यात आला. तसेच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली. तसेच आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) चे कलम 77खाली गुन्हा दाखल करण्यात आला.