कल्याण : आजकाल प्रेमासाठी वाट्टेल ते करणारी मंडळी आपल्याला दिसत असतात.असाच काहीसा प्रकार कल्याणमध्ये उघकीस आला आहे. प्रेमात आपल्या गर्ल फ़्रेंडला इंप्रेस करण्यासाठी बॉयफ्रेंड स्वता चोर बनून गर्ल फ्रेंडला महागडा मोबाईल देण्याचा प्रयत्न अंगलट आला आहे. प्रियकराने एका डिजिडल शॉपमधून विक्रीसाठी ठेवलेल्या एक लाख दहा हजाराचा मोबाईल लांपास केला असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेत त्याची प्रेयसी देखील सहभागी असल्याची माहिती उघड झाली आहे. कल्याण पूर्वेतील मॅट्रो मॉल मधील रिलायंस डिजिडल शॉपमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
प्रियकराचे वाट्टेल ते धाडस..
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रेमीयुगल ठाण्यातील एकाच खाजगी कंपनीत कामाला आहे. ऑफिस कामासाठी लेटेस्ट व्हर्जन असलेल्या मोबाईलची गरज असल्याचे सांगून त्यांनी ही चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सागर साहू (रा.साकीनाका, मुंबई) आणि प्रियंका मेनन (रा. कल्याण) असे अटक केलेल्या प्रेमीयुगलाचं नाव आहे. अनोखळी मुलगा आणि मुलगी मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्यानेच शॉपमध्ये गेले होते. त्यावेळी सिक्युरिटी पॉडवर विक्रीसाठी ठेवलेला एक लाख दहा हजार किमतींचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल ठेवला होता, तोच मोबाईल दोघांनी प्लॅन करून चोराला होता.
चोरी करतेवेळी आपल्यावर कोणी लक्ष देत नसल्याचे पाहून त्या मुलीने मोबाईल तिच्या बॅगेत टाकला. मात्र, मोबाईल लंपास करतानाच चित्रीकरण शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोबाईल चोरीला गेल्याचे समजल्यावर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात मुलगा आणि मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात..
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात मुलगा आणि मुलीची ओळख पटवून तपास सुरू केला. सागर आणि प्रियंका हे दोघे ठाण्यातील एका कन्सलस्टन ऑफिसमध्ये कामाला असतानाच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. तसेच ऑफिस कामासाठी प्रियंकाला लेस्टस मोबाईलची गरज होती. मात्र, तो मोबाईल एक लाखांच्या वर किमतींचा असल्याचे त्यांची ऐपत घेण्याची नव्हती, असे असतानाही दोघांनी पहिल्यादा चोरीच धाडस करून हा मोबाईल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.