जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “संजय राऊतांसाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला हवा”,अशा कडक शब्दांत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये”,असं संजय राऊत म्हणाले होते. या देशात भगवा झेंडा घेऊन चालेल त्यांचेच राज्य येणार आहे. जो भगवा हित की बात करेगा वही देश पे राज करेंगा, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. या वक्तव्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे
गिरीश भाऊंचे अंदाज बऱ्यापैकी चुकत नाही
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची एक तरी जागा निवडून आणून दाखवावी, असं चॅलेंज भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. याच विषयावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “गिरीश भाऊंचे अंदाज बऱ्यापैकी चुकत नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांचा राजकीय अंदाज खरा ठरो. माझ्या हाताने ते पेढा खावोत”,असं गुलाबराव पाटील म्हणाले.