मुंबई : मुंबई विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण ११ किलो ६२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. एकूण १८ प्रकरणांत ही कारवाई करण्यात आली असून या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ७ कोटी ४४ लाख रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्यामध्ये सोन्याचे दागिने, विटा, सोन्याची पावडर यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
तसेच १२ लाख रुपयांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, सोन्याचं मेण स्वरूपात सोन्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी परदेशी नागरिकांसह एकूण सात प्रवाशांना अटक केली आहे.
मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून हे तस्करीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. यापैकी काही प्रवाशांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये, बुटात, गुदद्वार तसेच अंतर्वस्त्रमध्ये देखील काही आरोपींनी हे सोने लपविल्याचे आढळून आले.
बातमी अपडेट होत आहे.