मुंबई : मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला नाशिकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली असून डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते. त्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
ही घटना नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ आज शुक्रवारी (ता. २२ मार्च) रोजी घडली. मुंबईहून गोरखपूरकडे जात असलेल्या गोदान एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली होती. ही आग पार्सल बोगीला लागली होती. या डब्यात लाखो रुपये किंमतीचा माल होता. तो संपूर्ण जळून खाक झाला आहे. या आगीच्या घटनेनंतर एक्स्प्रेस थांबवण्यात आली.
आग लागल्याचे समजताच प्रवाशांची चांगलीच धावपळ झाली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिकरोड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ गोदान एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याने एक्स्प्रेस थांबवण्यात आली. बोगीला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवासी आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. डब्यातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे मोठी खळबळ उडाली.