मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2024 ची सुरुवात शानदार झाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 12 व्या स्थानावर आहेत. हिडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर गौतम अदानी यांना मोठा दिलासा मिळाला याचा त्यांना खूप मोठा फायदा झाला.
गौतम अदानींची एका दिवसाची कमाई
61 वर्षांच्या गौतम अदानी यांचं साम्राज्य भारतात इन्फ्रास्ट्रक्टर, कमोडिटी अशा अनेक व्यवसायत पसरल आहे. गौतम अदानींची ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या यादीत 99.7 डॉलरच्या नेटवर्थ आहे. म्हणजेच गौतम अदानी 12 व्या स्थानावर आहेत. काल एका दिवसात त्यांच्या एकूण नेटवर्थमध्ये 7.6 बिलिअन डॉलरची भर पडली आहे. त्यांच्या नेटवर्थमध्ये 4.90 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा परिणाम
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी अदानी यांना हिंडनबर्ग प्रकरणातून क्लीन चीट दिली. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहिला मिळाली.एका दिवसात गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मादे टाकलं.
दरम्यान, ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या यादीत मुकेश अंबाना 13 व्या स्थानावर आहेत. 99 बिलिअन डॉलरची नेटवर्थ आहे. गुरुवारी म्हणजे 4 जानेवारीला अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये 983 मिलिअन डॉलर्सची भर पडली. अंबानी यांच्या एकूण नेटवर्थमध्ये 0.98 टक्के घसरण झाली. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी बाराव्या स्थानावर पोहोचले.