LPG Price Hike : आज १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती २१ रुपयांनी वाढवल्याचे समजत आहे. आजपासून 2023 च्या शेवटच्या महिन्याला सुरुवात झाली असून वर्षाचा शेवटचा महिना सुरु होताच सर्वसामान्यांना तेल कंपन्यानी मोठा झटका दिला आहे.
LPG सिलेंडरच्या दर वाढीनंतर, १९-किलोग्राम व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत नवी दिल्लीमध्ये १,७९६.५ रुपये आणि मुंबईमध्ये १,७४९ रुपये करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये किंमत १९६८.५ रुपये असेल तर कोलकातामध्ये १९०८ रुपये करण्यात आली आहे. हे दर आजपासून म्हणजेच १ डिसेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत.(LPG Price Hike)
दरम्यान, आजपासून 2023 च्या शेवटच्या महिन्याला सुरुवात होत असून वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. आधीपासूनच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी, तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत 41 रुपयांनी वाढ केली आहे, तर ही वाढ 19 Kg व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत करण्यात आली आहे. (Commercial LPG Price)
घरगुती सिलेंडरच्या किमतींत बदल नाही
दरम्यान, तेल कंपन्यांनी 14 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलेंडच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नसून IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आल्यानुसार, दिल्लीत घरगुती सिलेंडर 9.3 रुपयांना, कोलकात्यात 929 रुपयांना, मुंबईत 902.50 रुपयांना आणि चेन्नईत 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका संपताच भाव वाढ?
यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजीच्या किमती ५७ रुपयांनी कमी झाल्या होत्या. तर आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये मतदान पूर्ण होताच पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचे भाव वधारले आहेत. येत्या ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा म्हणजेच मतमोजणी व निकाल असणार आहे. (LPG Price Hike)
हे आहेत नवे दर
- दिल्ली – 1796.50 रुपये
- मुंबई – 1749.00 रुपये
- चेन्नई – १९६८.५ रुपये
- कोलकाता – १९०८ रुपये