मुंबई : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणसध्या मोठ्या चर्चेत आहे. यातच आता गणपत गायकवाड यांनी का गोळीबार केला, आणि त्याचे सीसीटीव्हीसमोर आले आहे. आत्मरक्षणासाठी गोळीबार केल्याचे गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे.
गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या कृत्यावर प्रतिक्रिया देताना, माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमधून बाहेर जाताना महेश गायकवाड याने चारशे जणांचा जमाव जमवून धक्कबुक्की केली. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात मारत असतील तर मग मी काय करणार? आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं असल्याचं आमदार गायकवाड यांनी सांगितलं.
हिल लाईन पोलीस स्थानकाच्या बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि त्याचे सहकारीने धक्काबुक्की करत वाद घालत असल्याचे दिसत आहे. वैभव गायकवाडसह इतर सहकारी वाद घालत असून पोलीस मध्यस्थी करत असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. जेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी आतमध्ये गोळीबार केला तेव्हा महेश गायकवाड यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला आमदार गायकवाड यांच्या भाच्याने खेचून मारहाण केल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
सध्या आमदार गणपत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने आमदारांसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अडचणीच वाढ झाली आहे. गोळीबार प्रकरणी गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.