पालघर : नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय तरुणीवर गुंगीच औषध पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाजप उपजिल्हाध्यक्षासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच भाजपाने त्याला पदमुक्त केलं आहे.
गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं भाजप वसई-विरार उपजिल्हाध्याचं नाव आहे. तसेच तो उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी आहे. त्याच्यासोबतच नवीन सिंग आणि त्याची पत्नी अशा तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये होळीच्या दिवशी संजू श्रीवास्ताव याने एका 22 वर्षीय तरुणीला कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने नालासोपारा येथील घरी बोलावले. तेथे तिला गुंगीकारक औषध पाजून तिच्यावर श्रीवास्तव आणि नवीन सिंग या दोघांनी बलात्कार केला होता. त्यावेळी तिच्या काढलेल्या अश्लील चित्रफितीच्या आधारे नवीन सिंग याने ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर बलात्कार केला.
या काळात पीडित गर्भवती राहिली होती. मात्र, तिच्या सहमती शिवाय तिचा गर्भपात आरोपीने घडवून आणला होता. यानंतरही पीडितेला आरोपीपासून एक मुलगी झाली आहे. मात्र सतत आरोपींकडून धमकी आणि शिविगाळ केली जात असल्याने पीडितेने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी आरोपी संजू श्रीवास्तव, नवीन सिंग आणि हेमा सिंग यांच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत. आचोळे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.