मुंबई: आपल्या नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो, याचे संतापजनक उदाहरण मालाडमध्ये समोर आले आहे. एका फळ विक्रेत्याने उंदरांनी फळे कुरतडू नयेत म्हणून चक्क फळांना उंदीर मारण्याचे विषारी औषध लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, फळे साठवून ठेवल्यानंतर रात्रीच्या वेळी उंदीर फळे कुरतडू नुकसान करतात. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी परप्रांतीय विक्रेत्याने ‘रातोळ’ नावाच्या विषारी क्रीमचा वापर केला. फळांच्या पृष्ठभागाला हे औषध लावल्यामुळे उंदीर फळांकडे फिरकत नाहीत, असा अजब तर्क त्याने लढवला.
‘Ratol’ पोटात जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण
‘Ratol’ सारख्या पदार्थांमध्ये अत्यंत घातक रसायने असतात. तज्ज्ञांच्या मते, तीव्र पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो, भीषण विषबाधा होऊ शकते, सर्वात गंभीर म्हणजे, यातील घटक मानवी यकृत कायमचे निकामी करू शकतात. लहान मुले किंवा वृद्धांसाठी हा प्रकार क्षणात जीवघेणा ठरू शकतो.
पाहा व्हिडीओ:
मालाडमध्ये परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा शिखरावर! फळांवर Ratol सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ. Ratol सारखे विषारी पदार्थ वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या विक्रेत्यावर कार्यवाही झालीच पाहिजे.#MNS #mybmc pic.twitter.com/RFtulkwO4h
— शेख जब्बार (राजसाहेबांचा जब्बार) | SHAIKH JABBAR (@jabbarsmns) February 24, 2026
अनेक वेळेस आपण घाईघाईत रस्त्यावरून फळे विकत घेतो आणि अनेकदा ती नीट न धुता खातो. हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सजग नागरिकांनी या विक्रेत्याला रंगेहाथ पकडले असून, या विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.







