मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोसाळकर हे आपल्या वॉर्डात नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते. त्याचवेळी त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला. दहिसर येथे ही घटना घडली असून आरोपींनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा एका आमदाराच्या जवळचा असल्याची चर्चा आहे.