मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबारात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.
आता दहीसरमध्ये माजी नगरसेवकावर झालेल्या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. गोळीबाराची ही घटना जसीच्या तशी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे बोलत आहेत. त्यांचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर ते जागेवरुन उठतात. त्याचवेळी त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला. विशेष म्हणजे हा मॉरीस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे एकत्र फेसबुक लाईव्ह करतात. त्यानंतर घोसाळकर आपलं बोलणं झाल्यानंतर अचानक ते जागेवरुन उठल्यावर त्यांच्यावर गोळीबार केला जातो. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कोण आहे माॅरिस नोरोन्हा?
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा माॅरिस नोरोन्हा हा दहीसरमध्ये परिचित होता. तो स्वत:ला स्वयंघोषित नेता समजत होता. अभिषेक घोसाळकर आणि माॅरिस नोरोन्हामध्ये एक वर्षांपूर्वी टोकाचा वाद झाला होता. मात्र, त्यांची पुन्हा मैत्री झाली होती. आता हीच पुन्हा झालेली मैत्री जीवावर बेतली आहे. दोघांमध्ये पैशांवरून वाद होता, अशीही माहिती समोर आली आहे. माॅरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वत:वरही तीन ते चार गोळ्या मारून घेत आत्महत्या केली. माॅरिसच्या समोर आलेल्या फोटोनुसार ही तो निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचे दिसून येते.
तीन गोळ्या थेट शरिरात घुसल्याने ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, मॉरिन नोरोन्हाने स्वतःलाही संपवलं pic.twitter.com/bWgjVTsWOO
— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) February 8, 2024