मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज कोकण दौ-यावर आहेत. आज दुपारी ते दापोलीमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी निवडणूक विभागाच्या अधिका-यांकडून हेलिपॅडवर आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
गेल्या बुधवारी कोकणाच्या दौ-यावर असणा-या उद्धव ठाकरे यांच्या गाडीची झडती घेण्यात आली होती. तर आज आदित्य ठाकरे यांच्या हॅलिपड आणि सामनाची तपासणी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, काल बुधवारी दिवसभरामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिदें, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि नाना पटोले या नेत्यांच्या बॅगांची तपासणी आयोगाच्या अधिका-यांकडून करण्यात आली.