मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आपली पहिली ४५ जणांची उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच बंडाच्या वेळी सोबत असणाऱ्या ३ आमदारांना मात्र अजून वाट बघावी लागणार आहे. पहिल्या यादीत त्यांचा समावेश झालेला दिसत नाही. त्या आमदारांना दुसऱ्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे.
कुणाला वाट बघावी लागणार?
डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून मागील सलग तीन टर्म आमदार असून यंदा चौथ्या टर्मसाठी ते सज्ज झाले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या सुरुवातीच्या आमदारांमध्ये बालाजी किणीकर यांचा समावेश होता. तसंच पक्षाचं खजिनदारपद सुद्धा किणीकर यांच्याकडेच आहे. त्यामुळे पहिल्या यादीतच त्यांची उमेदवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत किणीकर यांचं नाव नसल्यामुळे अंबरनाथ शहरात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बालाजी किणीकर यांना शिवसेना शिंदे गटातल्याच एका मोठ्या गटाचा विरोध असून किणीकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका या गटाने घेतली आहे. कदाचित त्यामुळेच तर किणीकर यांची उमेदवारी लांबणीवर पडली नाही ना? असे तर्क आता लावले जात आहे.शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नसून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. स्थानिक रोषामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपने नरमाईची आणि सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे..
- कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
- साक्री (अज) – मंजूळाताई गावित
- चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
- जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
- एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
- पाचोरा – किशोर पाटील
- मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
- जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
- चांदिवली – दिलीप लांडे
- कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
- माहिम – सदा सरवणकर
- भायखळा – यामिनी जाधव
- कर्जत – महेंद्र थोरवे
- अलिबाग- महेंद्र हरी दळवी
- महाड- भरतशेठ मारुती गोगावले
- उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
- परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
- सांगोला- शहाजी बापू पाटील
- कोरेगाव- महेश शिंदे
- पाटण- शंभूराज देसाई
- दापोली- योगेश कदम
- रत्नागिरी- उदय सामंत
- राजापुर- किरण सामंत
- सावंतवाडी- दीपक केसरकर
- राधानगरी- प्रकाश आबिटकर
- करवीर- चंद्रदिप नरके
- बुलढाणा – संजय गायकवाड
- मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
- दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
- रामटेक – आशिष जैस्वाल
- भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
- दिग्रस – संजय राठोड
- नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
- कळमनुरू – संतोष बांगर
- जालना – अर्जून खोतकर
- सिल्लोड – अब्दुल सत्तार
- खानापुर- सुहास बाबर
- छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल छत्रपती
- संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
- पैठण – विलास भूमरे
- वैजापूर – रमेश बोरनारे नां
- दगाव – सुहास कांदे
- मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
- ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
- मागाठाणे – प्रकाश सुर्वे