मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं भरभरून मत दिलं आहे. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी भव्य-दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरं वाटत नसल्याने ते आज दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. त्यादरम्यान, त्यांना माध्यमांनी त्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता “माझी तब्येत चांगली होती. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता बरी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे रुग्णालयात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि मुलगा श्रीकांत शिंदे हे देखील होते. शिंदे यांचे कुटुंबीय रुग्णालयात त्यांच्यासोबत होते.