मुंबई : शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली आहे. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनेकदा नोटीस धाडली होती, अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे.