Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जयंत पाटील यांना डच्चू? शरद पवार गटात काही आलबेल नाही?; ९ जानेवारीला राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 27 December 2024, 15:21

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट फुटणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. याबाबतचं थेट वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं. जयंत पाटील यांच्यासाठी महायुतीत एक मंत्रीपद रिक्त ठेवलं आहे. अधिवेशनानंतर जयंत पाटील काही आमदारांना घेऊन अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा आशयाचं वक्तव्य मिटकरींनी केलं होतं. ही घडामोड ताजी असताना शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जयंत पाटील यांची शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पत्ता कट होणार असल्याचं आता बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागा लढवत ८ जागांवर विजय मिळवत जोरदार यश प्राप्त केलं होतं. पण विधानसभा निवडणुकीत पवार गटाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. शरद पवार गटाने ८६ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. मात्र केवळ १० जागांवरच शरद पवार गटाचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येत्या ९ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय घेण्याच बोललं जात आहे. जयंत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत विविध जागांवर जयंत पाटलांनी इलेक्टीव्ह मेरीट लक्षात न घेऊन तिकीट दिल्याचा आरोप पक्षातूनच केला जात आहे.

एकीकडे, जयंत पाटील महायुतीत सामील होणार असल्याचा दावा केला जात असताना, शरद पवार गटात नेतृत्वबदलाच्या सुरू असलेल्या हालचाली पाहता, पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे. पक्षफुटण्याच्या शक्यतेमुळेच जयंत पाटलांचा पत्ता कट केला जात आहे, अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ९ जानेवारीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

पोटच्या मुलीसह आईची आत्महत्या; घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp