Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dr Nitin Karir : डॉ. नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव, मनोज सौनिक हे निवृत्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 20:14

Dr Nitin Karir : मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक हे निवृत्त झाले आहेत. डॉ. नितीन करीर हे 1988 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांचा कालावधी हा 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळू शकते.

राज्य सरकारने सौनिक यांचा कार्यकाळ वाढवण्याची विनंती केंद्राला केली होती. मात्र, त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही. सौनिक यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून 30 एप्रिल ते 31 डिसेंबर या कार्यकाळात जबाबदारी सांभाळली. डॉ. नितीन करीर यांनी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पदभार स्वीकारला. नितीन करीर यांची सेवानिवृत्ती 31 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्याच दरम्यान लोकसभा निवडणुका असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

डॉ. नितीन करीर हे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. आता मुख्य सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. डॉ. करीर यांनी यापूर्वी माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.

महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर यांनी एमबीबीएस पदवी घेतली. त्यांची 1988 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45

‘एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी!’ पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण

Saturday, 5 September 2026, 19:22

आईने चिमुकल्याला कवटाळलं अन् दोघांनीही धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली; छत्रपती संभाजीनगरात हृदयद्रावक घटना

Saturday, 5 September 2026, 18:36
Next Post

Uruli Kanchan : शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp