पालघर : महायुतीमध्ये पालघरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला असून, ही जागा शिंदे सेनेकडून भाजपाने घेत या जागेवर विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत सावरा यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. पालघरमध्ये आता भाजपाचे सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांचा सामना रंगणार असून, बहुजन आघाडीचे राजेंद्र पाटील तर वंचितकडून विजया म्हात्रे यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. याशिवाय, आणखी सात जण रिंगणात आहेत. ही जागा शिंदे गटाकडे होती. मात्र, जागावाटपात ती भाजपकडे आली आहे.