मुंबई : डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचे समजले आहे. स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.
यावेळी आकाशामध्ये धुराचे लोट पसरले आहेत. स्फोटामुळे मोठा हादरा बसला होता. अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
यावेळी नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना एम्स रुग्णालयात हलवले जात आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग सिलेंडरची आहे की इतर कशाची याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.