डोंबिवली : जग असंवेदनशील होत चालले आहे. डोंबिवलीत कौटुंबिक हिंसाचाराची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मुलगा आणि आईला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे. पत्नीच्या माहेरी आपल्या दोन मुलांना भेटण्यासाठी गेलेले वडील आणि त्यांची आई यांना मारहाण करण्यात आली आहे.
डोंबिवलीत एक दाम्पत्य राहायचे. दोघांना लग्नानंतर दोन मुले झाली. पण लग्नानंतर काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. त्यामुळे दोघांनी परस्परांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. महिलेने आपल्या दोन्ही मुलांना सोबत माहेरी नेले. या महिलेचे माहेरही डोंबिवलीतच होते. तिला दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. मुलांच्या आजीने आपल्याला नातवंडांना भेटावसे वाटत असल्याचे त्यांच्या मुलाला सांगितले. वडील त्यांच्या आईला पत्नीच्या माहेरी घेऊन गेले.
पत्नी तिच्या माहेरी राहायला गेली होती. पत्नी नोकरी करते. त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांकडे मुले ठेवून कामावर जायची. वडील आणि आजी सासरी गेले तेव्हा त्यांच्या सासच्यांनी त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यांना सासूने आणि दोन्ही मेहुण्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. मुलांचा आणि तुझा काय संबंध? असे म्हणत त्यांनी वडीलांना मारहाण केली. इतकेच नाही तर सासूने त्याच्या वृद्ध आईलाही विवस्त्र करुन मारहाण केली.
यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोघांची सुटका झाली. याप्रकरणी दोन्ही मेहुणे आणि सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणी आता तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.